Friday, 4 August 2023
Monday, 5 June 2023
सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न
शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. ०१/०४/२०२३ ते १३/०५/२०२३ या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आला. सदर प्रशिक्षण वर्गात ३५ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
पदवीचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणे व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे या बरोबरच विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त करून बेरोजगार न राहता ते स्वतः काही तरी मिळवून स्वतः च्या गरजा भागविण्यासाठी गरजेचे आहे. म्हणून मराठी विभागाच्या वतीने एक महिन्याच्या या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन मा. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड व मराठी विभाग प्रमुख डॉ उज्ज्वला पाटील यांनी केले.
वरील प्रशिक्षण वर्ग पूर्ण केलेला विद्यार्थी कोणत्याही लहान मोठ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन उत्तमरीत्या करु शकतो. एकदा का तो चांगले सूत्रसंचालन करतो ही बातमी समाजात पसरली की आपोआप त्याला अनेक कार्यक्रमाचे आयोजक बोलीतील. त्याला काम मिळेल आणि त्यातून मोबदला ही मिळेल. या प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक डॉ उज्ज्वला पाटील हे होते. तर अभ्यागत वक्ते म्हणून प्रा. विलास सुर्वे यांनी सहकार्य केले. हे प्रशिक्षण वर्ग मा. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली यशस्वी झाले.