Monday, 5 June 2023

सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

            शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. ०१/०४/२०२३ ते १३/०५/२०२३ या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आला. सदर प्रशिक्षण वर्गात ३५ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. 

             पदवीचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणे व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे या बरोबरच विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त करून बेरोजगार न राहता ते स्वतः काही तरी मिळवून स्वतः च्या गरजा भागविण्यासाठी गरजेचे आहे. म्हणून मराठी विभागाच्या वतीने एक महिन्याच्या या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन मा. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड व मराठी विभाग प्रमुख डॉ उज्ज्वला पाटील यांनी केले.     

                   वरील प्रशिक्षण वर्ग पूर्ण केलेला विद्यार्थी कोणत्याही लहान मोठ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन उत्तमरीत्या करु शकतो. एकदा का तो चांगले सूत्रसंचालन करतो ही बातमी समाजात पसरली की आपोआप त्याला अनेक कार्यक्रमाचे आयोजक बोलीतील. त्याला काम मिळेल आणि त्यातून मोबदला ही मिळेल. या प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक डॉ उज्ज्वला पाटील हे होते. तर अभ्यागत वक्ते म्हणून प्रा. विलास सुर्वे यांनी सहकार्य केले. हे प्रशिक्षण वर्ग मा. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली यशस्वी झाले.  

Tuesday, 20 September 2022

स्वप्न बघायला शिकल्या शिवाय माणूस मोठा होत नाही. मा. प्रा. विनायक पवार

 सुप्रसिद्ध मराठी चित्रपट गीतकार व अभिनेते मा. प्रा. डॉ. विनायक पवार यांनी आज शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. 'लेखक आपल्या भेटीला'या सदराखाली त्यांनी महाविद्यालयातील मराठी विभागात भेट दिली. तत्प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी वरील विचार मांडले. ते पुढे म्हणाले की, जीवनात खरोखरच यशस्वी व्हायचे असेल तर माणसाने आनंदी रहायला शिकले पाहिजे. त्यासाठी कविता हे एक प्रेरणादायी स्त्रोत आहे. यावेळी त्यांनी'आजोबा', 'बाप'या कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर एक प्रेमकविता ही सादर केली आणि वातावरण मिस्किल भावनांनी भरून गेले. शेवटी विद्यार्थ्यांनी विचार व भावनांचा मेळ घालून प्रयत्न केले तर यशाचे शिखर नक्कीच पार करु शकाल असेही त्यांनी सांगितले. 

अध्यक्षीय मनोगत मांडताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले की, मा. विनायक पवार यांचे आपल्या संस्थेशी ऋणानुबंधाचे नाते आहे. एका सर्वसामान्य तांड्यावरुन आलेला माणूस चित्रपट गीतकार, अभिनेता व साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळवला असूनही त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काव्य लेखन करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही सुध्दा चांगले लेखक होऊ शकेल. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ.उज्ज्वला पाटील यांनी करून दिले, तर आभार डॉ. दयानंद कराळे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. 



Tuesday, 16 June 2020

संतांची शिकवण काळाची गरज

        संतचरित्रे परमपवित्र रे सादर वर्णावी।असे संत नामदेवांनी लिहिले व त्यातून संतांबद्दलचा आदर व्यक्त केला.संत म्हणजे साक्षात देव. संत म्हणजे पृथ्वीवर वावरणारी परमेश्र्वराची प्रतिमा.म्हणून 'जगाच्या किल्ल्याचा संतांच्या विभूती'असा त्यांचा गौरव केला जातो.ते त्यांच्या ठिकाणी असलेल्या दया,क्षमा, परोपकार, कणवाळूपणा या गुणांमुळे च. आपल्या सहवासात आलेल्या लोकांचे दु:ख दूर करणे हा संतांचा धर्म, कारण संत हे नि:स्वार्थी भावनेने समाजाची सेवा करीत असतात. 'हे विश्वची माझे घर','बुडती हे जन देखवेना डोळा'अशी त्यांची वृत्ती असते. दु:खितांचे दु:ख निवारण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.
       'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले','सर्व धर्म समभाव','प्राणीमात्रांवर दया', 'जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा', मानवीयता,  निसर्गाचे महत्त्व, अशा अनेक गोष्टींची शिकवण त्यांच्या आचरणातून मिळते. ज्याची आजच्या समाजाला अत्यंत गरज आहे. आपल्या कर्तृत्वामुळे व चारित्र्य संपन्नतेमुळे असे संत अमर झाले आहेत.
       आज जागतिकीकरणामुळे माणूस स्वत:मध्येच गुरफटत चालला आहे.'मी'पणाची भावना वाढवल्यामुळे अहंकार, लोभ, मोह वाढून'आम्ही'हे शब्द तो विसरत चालला आहे. सुखासीनतेमुळे पैसा, प्रतिष्ठा यांच्यातच तो घुटमळत आहे. साध्या साध्या गोष्टींनी गैरसमज वाढून कर्तव्यापासून विचलित झाल्यामुळे त्याच्यात स्वार्थीपणा वाढत आहे. म्हणून अशा समाजाला कर्तव्याची व मानवीयतेची जाणीव करून देण्यासाठी आज संतांच्या विचारांची व शिकवणीची गरज आहे असे मला वाटते.

Wednesday, 16 December 2015

Samartha Sampraday Book Exhibition Visit

मराठी विभागातील प्राध्यापिका डॉ.कोमल कुंदप यांनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामी मठाच्या वतीने जुन्या कृष्णामाई सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनास भेट दिली.मठाच्यावतीने सदस्य स्वामींनी पुस्तक प्रदर्शनाचा हेतू विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विभागाचे वतीने काही पुस्तके खरेदी करण्यात आली.

Speech : G. D. Madgulkar

Prof. D. N. Karale 
(College of Education, Karad) 
Speech on G. D. Madgulkar's life and work

Prof. Dr. U. R. Patil 
Introduction of program 
विभागाचे वतीने ग. दि. माडगूळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. दयानंद कराळे यांचे 'ग.दि.माडगूळकर:जीवन व कार्य'या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी माडगूळकरांच्या जीवनातील काही प्रसंगांना उजाळा दिला. आणि त्यांच्या साहित्य निर्मिती चि आढावा घेताना त्यांचे गीतरामायण थोडक्यात गाऊन दाखवले. तेव्हा विद्यार्थी व उपस्थित मान्यवर भारावून गेले. 
याप्रसंगी प्राचार्य डॉ जे. एस. पाटील, डॉ. जे. एल. म्हेत्रे, प्रा. यू. आर. माने व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.