मराठी विभागातील प्राध्यापिका डॉ.कोमल कुंदप यांनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामी मठाच्या वतीने जुन्या कृष्णामाई सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनास भेट दिली.मठाच्यावतीने सदस्य स्वामींनी पुस्तक प्रदर्शनाचा हेतू विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विभागाचे वतीने काही पुस्तके खरेदी करण्यात आली.
Wednesday, 16 December 2015
Speech : G. D. Madgulkar
Prof. D. N. Karale
(College of Education, Karad)
Speech on G. D. Madgulkar's life and work
Prof. Dr. U. R. Patil
Introduction of program
विभागाचे वतीने ग. दि. माडगूळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. दयानंद कराळे यांचे 'ग.दि.माडगूळकर:जीवन व कार्य'या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी माडगूळकरांच्या जीवनातील काही प्रसंगांना उजाळा दिला. आणि त्यांच्या साहित्य निर्मिती चि आढावा घेताना त्यांचे गीतरामायण थोडक्यात गाऊन दाखवले. तेव्हा विद्यार्थी व उपस्थित मान्यवर भारावून गेले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ जे. एस. पाटील, डॉ. जे. एल. म्हेत्रे, प्रा. यू. आर. माने व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Thursday, 5 November 2015
Reading Inspiration
Reading Inspiration
Chief Guest- Dr.Kanhaiya Kundap
Chair person : Principal Dr. J. S. Patil
शिक्षण महर्षि बापूजी साळुंखे महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मा. प्रा. डॉ. कन्हैया कुंदप यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात ते म्हणाले की, आजच्या काळात तरुण पिढी ही पुस्तकां पासून दूर होते आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध प्रकारचे वाचन विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. प्रकट वाचनाची सवय लागली तर बुद्धी सतेज राहते. सततच्या वाचनाने शब्दसंग्रह वाढतो. नवनवीन माहिती आत्मसात करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाची मैत्री करावी. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत वाचन करीत होते. एक खंदा वाचक, एक शास्त्रज्ञ, एक तत्ववेत्ता. जिज्ञासू अभ्यासक म्हणून डॉ.कलामांचे कार्य आजच्या काळात फार मोलाचे आहे. तरुणांनी कलामांच्या इच्छेप्रमाणे भारत महासत्ता होण्यासाठी कलामांच्या विचारांची कास धरावी.
Wallpaper Inauguration
Wallpaper Inauguration
Chief Guest : Dr. Mahesh Gaikwad
Chair Person : Principal Dr. J. S. Patil
Guiding - Dr. Mahesh GayakwadIntroduction - Dr. U. R. Patilशिक्षण महर्षि बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने वाड्. मय मंडळ उद्घाटन व शब्दगंध भित्तिपत्रिकेचे अनावरण प्रमुख पाहुणे डॉ. महेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे. एस. पाटील होते. यावेळी मार्गदर्शन करताना मा. प्रा डॉ महेश गायकवाड म्हणाले की, मराठी भाषा आणि साहित्य हे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात व जीवनात व्यापून राहिले आहे. मराठी साहित्य हे विविधतेने नटलेले आहे. त्यामुळे एक सृजनशील लेखक म्हणून मी सांगू इच्छितो की, आजच्या तरुण पिढीला आठवड्याला एक तरी पुस्तक वा ग्रंथ वाचणे आवश्यक आहे. पुस्तके आपले मित्र आहेत आणि ते आपल्याला खुणावत असतात. आपली बौद्धिक संपदा वाढवण्यासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी जास्तीत जास्त प्रमाणात वाचन केले पाहिजे. साहित्य हे काही आपल्या पासून वेगळे नाही. शब्द आणि त्याचे नेमके अर्थ कळाले की आपण आपोआपच त्याकडे आकर्षित होत जातो. म्हणून समजून घेऊन साहित्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा.
Subscribe to:
Posts (Atom)