Reading Inspiration
Chief Guest- Dr.Kanhaiya Kundap
Chair person : Principal Dr. J. S. Patil
शिक्षण महर्षि बापूजी साळुंखे महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मा. प्रा. डॉ. कन्हैया कुंदप यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात ते म्हणाले की, आजच्या काळात तरुण पिढी ही पुस्तकां पासून दूर होते आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध प्रकारचे वाचन विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. प्रकट वाचनाची सवय लागली तर बुद्धी सतेज राहते. सततच्या वाचनाने शब्दसंग्रह वाढतो. नवनवीन माहिती आत्मसात करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाची मैत्री करावी. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत वाचन करीत होते. एक खंदा वाचक, एक शास्त्रज्ञ, एक तत्ववेत्ता. जिज्ञासू अभ्यासक म्हणून डॉ.कलामांचे कार्य आजच्या काळात फार मोलाचे आहे. तरुणांनी कलामांच्या इच्छेप्रमाणे भारत महासत्ता होण्यासाठी कलामांच्या विचारांची कास धरावी.
No comments:
Post a Comment